माहीरा खान ही पाकिस्तानची अभिनेत्री. खरंतर तिथे तिचं मोठं फॅन फॉलोईंग आहे. भारतात ती सर्वश्रुत झाली ती रईस चित्रपटामुळे. शाहरूख खानच्या रईसमध्ये तिने नायिकेची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला खरा. पण त्यावेळी माहीरा इथे नव्हती. कारण, दरम्यान 2016 मध्ये उरीचा हल्ला झाला आणि पाकिस्तानी कलाकारांना भारत बॅन झाला. आता त्याला पाच वर्षं उलटून गेल्यावरही माहीराला भारतात यायची किंवा भारतातल्या काही कलाकृतींमध्ये काम करायची भीती वाटते. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने ही बाब उघड केली 


माहीरा खानला सध्या पुन्हा एकदा भारतातून चित्रकृती्च्या काही ऑफर्स येत आहेत. याची माहीती तिनेच दिली. याबद्दल माहीती देताना ती म्हणते, गेल्या काही काळापासून मला पुन्हा एकदा भारतातून काम करण्याबद्दल विचारणा होऊ लागली आहे. त्यातल्या काही वेबसीरीज होत्या. अनेक वेबसीरीजचा विषय खरच चांगला होता. पण मला त्यात काम करायची भीती वाटते. आणि हे कारण लपण्यासारखं नाही. मला खरंच भीती वाटते. आपण यात काम करावं की नाही. ते केलं तर त्याचे राजकीय पडसाद उमटतील का असंही वाटतं. त्यामुळे मी सरळ या सर्व ऑफर्स नाकारल्या. 


उरी हल्ल्यानंतर भारताने सर्व पाकिस्तानी कलाकारांवर बॅन टाकला. त्यानंतर कोणीही पाकिस्तानी कलाकार भारतात येत नाही. माहीरा याबद्दल बोलताना म्हणते, हा निर्णय खरंतर चुकीचा आहे. कलाकार म्हणून आम्ही काम करत असतो. आपण घेतलेल्या कामाचा परिणाम पुढे आपल्या करिअरवर होतो. त्याचं राजकीय भांडवल केलं जातं. ते फार बरं नाही. काम करावं की नाही.. याची भीती वाटते. अनेक वेबसीरीजचं काम भारताबाहेर चालू आहे. तिथे काम करण्याची मागणी होते. पण मग पुन्हा भीती वाटते. 


या भीतीमुळेच कोणत्याही भारतीय ओटीटीची ऑफर माहीरा स्वीकारत नाहीय. ती म्हणते, गेल्यावेळचा माझा अनुभव खरंच दुर्दैवी होता. म्हणजे जे मी अनुभवलं ते भीतीदायक होतं. आता आपण सगळेच त्या गोष्टी विसरून पुढे आलो आहोत. आणि तुम्ही काही निर्णय घेतले की त्याचे राजकीय पडसाद उमटणं भयानक आहे. त्यामुळे मी यापुढे असं काही काम करणार नाही हे ठरवून टाकलं आहे. कारण मला त्याची भीतीच वाटते.