आत्महत्येवेळी प्रत्युषा बॅनर्जी गर्भवती होती?
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2016 10:10 AM (IST)
मुंबई : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येवेळी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. यासंदर्भातील काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रत्युषाच्या गर्भाशयात काही इन्फेक्शन झाल्याचीही शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. मात्र हा प्राथमिक अंदाज असल्यानं याबाबत ठोस माहिती आलेली नाही. मात्र, प्रत्युषा बॅनर्जीची मैत्रिण आणि अभिनेत्री सारा खान हीनं प्रत्युषा गर्भवती असल्याची शक्यतेला नकार दिला आहे. याऊलट प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज प्रत्युषाला त्रास द्यायचा. त्यामुळे तिनं याआधीही दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा दावा सारा खाननं केला आहे. दरम्यान, या सर्व तपासासाठी मुंबई पोलिसांनी आज प्रत्युषाचं घर सील केलं आहे. प्रियकर राहुल राजची कसून चौकशी सुरु आहे. आज राहुल राजची चौकशीदरम्यान प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.