Waheeda Rehman:   ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान (Waheeda Rehman) यांना  दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर करण्यात आला आहे.  माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी ट्वीट शेअर करुन घोषणा केली. दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वहीदा रेहमान यांनी आनंद व्यक्त केला आहे. 


काय म्हणाल्या वहीदा रेहमान?


PTI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वहीदा रेहमान म्हणाल्या, "मी खूप आनंदी आहे. मला दुप्पट आनंद झाला आहे कारण देव आनंद यांचा आज बर्थ-डे आहे. मला असं वाटतं, त्यांना भेटवस्तू मिळणार होती, पण मला मिळाली. (तौफा उनको मिलना था, मुझे मिल गया)" 


ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वहीदा रेहमान म्हणाल्या, 'मी खूप खुश आहे. हा सरकारचा एक मोठा पुरस्कार आहे. त्यासाठी मी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानू इच्छिते'






वहीदा रेहमान आणि देव आनंद यांचे चित्रपट


गाईड, सीआयडी, प्रेम पुजारी,काळा बाजार, बात एक रात की यांसारख्या चित्रपटांमध्ये वहीदा रेहमान आणि देव आनंद यांनी एकत्र काम केले होते.देव आनंद यांच्या  100 व्या जयंतीच्या दिवशीच वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


अनुराग ठाकूर यांनी ट्वीट शेअर करुन दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा केली. त्यांनी  ट्वीटमध्ये लिहिलं, "वहीदा रेहमान यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हे जाहीर करताना मला खूप आनंद आणि सन्मानाची भावना आहे. वहीदा रेहमान  यांच्या हिंदी चित्रपटांमधील भूमिकांची समीक्षकांनी प्रशंसा केली आहे."


एक फूल चार काँटे, चाँदनी, दिल्ली 6, बीस साल बाद या चित्रपटांमध्ये वहीदा रेहमान यांनी साकारलेल्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले. आता  दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी वहीदा रेहमान यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Waheeda Rehman: ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अनुराग ठाकूर यांनी ट्वीट शेअर करुन दिली माहिती