The Kashmir Files:  2022 मधील चर्चेत असलेला आणि कोट्यवधींची कमाई करणाऱ्या 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटाला अनेकांची पसंती मिळाली. 'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केलं आहे.  प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा (Saeed Akhtar Mirza) यांनी आता या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधले. 


काय म्हणाले सईद अख्तर मिर्जा? 
'माझ्यासाठी द कश्मीर फाईल्स हा चित्रपट कचरा आहे.  काश्मिरी पंडितांचा मुद्दा कचरा आहे का? तर नाही. ते वास्तव आहे. फक्त काश्मिरी हिंदूना त्रास सहन करावा लागला का? तर याचं उत्तर देखील 'नाही' असं आहे. मुस्लिम देखील गुप्तचर संस्था आणि सीमेपलीकडील पगारी लोक यांच्या कारस्थानांच्या अविश्वसनीय जाळ्यात अडकले आहेत. जे सतत कहर करत आहेत.  माणूस व्हा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा.' असं सईल अख्तर मिर्जा म्हणाले. 


कोण आहेत सईद अख्तर मिर्जा? 
1980 मध्ये रिलीज झालेल्या 'अल्बर्ट पिटों को गुस्सा क्यों आता है' तसेच 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहन जोशी हाजीर हो या चित्रपटांमुळे सईद अख्तर मिर्जा यांना विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांनी कर्मा कॅफे नावाची शॉर्ट फिल्म लिहिली जी 2018 मध्ये प्रदर्शित झाली. तसेच त्यांनी 1987 मधील नुक्कड आणि 1988 मधील इंतझार या मालिकेंचे दिग्दर्शन केले. 


गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कश्मीर फाईल्स  या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चित्रपट निर्माते नदाव लॅपिड  हे चर्चेत होते .'कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रोपोगंडा आणि वल्गर आहे' असं नदाव लॅपिड म्हणाले होते. त्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर देखील दिलं. 


द कश्मीर फाईल्स या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील कलाकारांना आणि चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या विषयांवर आधारित आहे.  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तसेच अनेक सेलिब्रिटींनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


The Kashmir Files: 'हे कोणीतरी बोलणं गरजेचं होतं'; अखेर 'द कश्मीर फाइल्स'बाबत केलेल्या वक्तव्यावर नदाव लॅपिड यांनी सोडलं मौन