Vivek Agnihotri:   दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या 'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकतीच विवेक यांनी द वॅक्सीन वॉर या चित्रपटाबाबत नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच काही नेटकऱ्यांनी ट्विटरवर विवेक यांना जवान  (Jawan)  या चित्रपटाबाबत देखील प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरं देखील विवेक यांनी दिली. 


विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर  आस्क व्ही आर ए हे सेशन केले. या सेशनमध्ये काही नेटकऱ्यांनी विवेक अग्निहोत्री यांना शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान या चित्रपटाबाबत प्रश्न विचारले. या प्रश्नांना विवेक यांनी दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.


विवेक अग्निहोत्री यांना एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला, जवान चित्रपट पाहणार का? या प्रश्नाचं विवेक यांनी उत्तर दिलं, 'फर्स्ट डे फर्स्ट शो, पण तिकीटं कुठे आहेत? यार, प्लिज शाहरुखला सांगून मला तिकीट मिळवून द्या' 






एका युझरनं  विवेक अग्निहोत्री यांना प्रश्न विचारला,  'जवान चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?'  या प्रश्नाचं विवेक यांनी उत्तर दिलं, 'अद्भुत, Mind blowing. Blockbuster written all over it.'






द वॅक्सीन वॉर कधी होणार रिलीज?


विवेक अग्निहोत्री यांचा द वॅक्सीन वॉर हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात  नाना पाटेकर (Nana Patekar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), राइमा सेन, सप्तमी गौडा आणि अनुपम खेर (Anupam Kher)  यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी आर. माधवननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन द वॅक्सीन वॉर या चित्रपटाचं कौतुक केलं होतं.


जवान कधी होणार रिलीज?


जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरमध्ये शाहरुखचा हटके अंदाज बघायला मिळाला. आता जवान या चित्रपटाची शाहरुखचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या


The Vaccine War First Review Out: विवेक अग्निहोत्रींच्या 'द वॅक्सीन वॉर'चं आर माधवनने केले कौतुक; पोस्ट शेअर करत म्हणाला...