मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं लग्न हे 2017 वर्षातलं सर्वात चर्चेत राहिलेलं लग्न होतं. सध्या दोघे दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात आहेत. लग्नानंतर त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकताच विराटचा एक फोटो समोर आला आहे, तो पाहून तुमच्या मनात विराटविषयी अधिक आदर निर्माण होईल.

इन्स्टाग्रामवर एका फॅनक्लब पेजने विराटचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत विराटने लग्नाची अंगठी गळ्यात घातलेली दिसत आहे. "हसबंड गोल्स, सरावाला जाताना विराट आपल्या लग्नाची अंगठी गळ्यात घालतो," असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे.


मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या सरावादरम्यान विराट प्रत्येकवेळी अंगठी चैनमध्ये अडकून गळ्यात घालतो. विराट अंगठी काढून ठेवण्याऐजी ती गळ्यात घालणं पसंत करतो, असं सांगितलं जात आहे.



क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर आहे. त्यामुळे लग्नानंतर अनुष्काही पती विराटसोबत आफ्रिकेत दाखल झाली आहे. इथे विराट क्रिकेट मालिका खेळणार असून अनुष्का सुट्टी एन्जॉय करत आहे.

कदातिच अनुष्का आफ्रिकेत जास्त दिवस राहणार नाही. पण विराटने लग्नाची अंगठी गळ्यात घालून अनुष्कासाठी हटके पद्धतीने आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.