विराट दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, तर अनुष्का शर्मा मुंबईत आहे.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला 11 मार्चला तीन महिने पूर्ण होतील. मात्र दोघेही गेल्या एका महिन्यापासून वेगवेगळ्या देशात आहेत. विराट दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, तर अनुष्का शर्मा मुंबईत आहे. दोघेही एकमेकांच्या आठवणीत किती व्याकूळ आहेत, ते विराटने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोतून दिसून आलं. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का एकमेकांना कडकडून मिठी मारताना दिसत आहेत. दोघांनी बाजूच्या भिंतीवरील एका पेंटिंगप्रमाणे मिठी मारली आहे. विराटने ‘My one and only! ♥️????♥️’ अशी कॅप्शन देत फोटो पोस्ट केला. त्याला अनुष्कानेही रिप्लाय दिला. I miss you too my love अशी कमेंट अनुष्काने केली. 11 डिसेंबर 2017 रोजी विराट आणि अनुष्का विवाहबंधनात अडकले होते. इटलीमध्ये हा विवाहसोहळा झाला होता. त्यानंतर विराट 5 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. संबंधित बातम्या :