मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मुंबईतील वरळीमध्ये नवीन फ्लॅट विकत घेतला आहे. विराट पत्नी अनुष्कासोबत नव्या घरात लवकरच शिफ्ट होणार आहे, मात्र तोपर्यंत दोघांनी भाड्याच्या घरातून संसाराला सुरुवात केली आहे.
वरळीत भाड्यावर घेतलेल्या घरासाठी कोहलीला महिन्याकाठी 15 लाख रुपये मोजावे लागत आहेत. तर दीड कोटी रुपये डिपॉझिट त्याने भरण्यात आलं आहे. स्टॅम्प ड्युटी म्हणून एक लाख रुपये देण्यात आले आहेत.
वरळीत रहेजा लिजंड या चाळीस मजली इमारतीत टॉप फ्लोअरवर हा फ्लॅट भाड्याने घेण्यात आला आहे. 2 हजार 675 चौरस फुटाचा हा फ्लॅट असून कोहलीने 24 महिने म्हणजे दोन वर्षांसाठी तो भाड्यावर घेतला आहे.
कोहलीने नुकताच या घरातल्या बाल्कनीतून दिसणाऱ्या मुंबईचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. 'तुमच्या घराच्या बाल्कनीतून इतका शानदार व्ह्यू दिसत असेल, तर कोणाला ते सोडून दूर जावंसं वाटेल?' असं कॅप्शन विराटने दिलं होतं.
कोहलीने 2016 मध्ये वरळीत 'स्काय बंगलो' या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक केला होता, मात्र त्या इमारतीचं बांधकाम अद्याप पूर्ण झालेलं नाही. आठ हजार चौरस फुटाचा हा फ्लॅट 2019 मध्ये तयार होईल.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात विराट-अनुष्का विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर कोहलीने दिल्ली सोडून मुंबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर वरळीत हा फ्लॅट भाड्यावर घेण्याता आला.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महिन्याला 15 लाख भाडं, विराट-अनुष्काचं वरळीतील घर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2018 01:34 PM (IST)
वरळीत रहेजा लिजंड या चाळीस मजली इमारतीत टॉप फ्लोअरवर हा फ्लॅट भाड्याने घेण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -