विराट कोहलीच्या घरी अनुष्काचा गृहप्रवेश
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2017 12:58 PM (IST)
सासरी स्वागत झाल्यावर कोहली कुटुंबासोबत गप्पा मारताना नवदाम्पत्याचा फोटो पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली : इटलीमध्ये लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर अनुष्का शर्माने विराट कोहलीच्या घरी गृहप्रवेश केला आहे. हनिमूनहून परतल्यानंतर अनुष्काने सासरचं माप ओलांडलं आहे. अनुष्का-विराटचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सासरी स्वागत झाल्यावर कोहली कुटुंबासोबत गप्पा मारताना नवदाम्पत्याचा फोटो पाहायला मिळत आहे. कोहलीची बहीण भावना कोहली धिंग्रा अनुष्का-विराटसोबत फोटोमध्ये दिसत आहे. दिल्लीत उद्या म्हणजे 21 डिसेंबरला, तर मुंबईत 26 डिसेंबरला मुंबईत विरानुष्काचं रिसेप्शन होणार आहे. 11 डिसेंबरला विराट आणि अनुष्का लग्नाच्या बेडीत अडकले होते. इटलीच्या सियेनामधील बोर्गो फिनोकियोतो या ऐतिहासिक आणि सर्वात महागड्या रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा झाला. संबंधित बातम्या :