मुंबई: राज्याचे लोकप्रतिनिधी मंचावर उपस्थित असताना राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात नियमांची पायमल्ली केली गेल्याचं बोललं जातं आहे. मुंबईतल्या वांद्रे रेक्लेमेशन मैदानात 54 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं वितरण केलं गेलं.


हा कार्यक्रम रात्री दहानंतरही सुरुच राहिला. बाजूला लिलावती हॉस्पिटल असूनही मोठ्या आवाजात अनेक गाण्यांवर नृत्याचा कार्यक्रम पार पडला. महत्वाचं म्हणजे हे सगळं होत असताना राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, भाजप आमदार आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते मंचावर उपस्थित होते.

इतर कोणत्याही कार्यक्रमांना रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी असते. मात्र, पुरस्कार सोहळा दहानंतरही सुरु होता. त्यामुळे याप्रकरणी नेमकी कोणती कारवाई केली जाणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे.