मुंबई : पैलवान विनेश फोगटला झालेली दुखापत दुर्दैवी आहे. पण तिची चुलत बहिण बबिता फोगट रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक नक्की जिंकेल, असा विश्वास बॉलिवूड अभिनेता आमीर खानने व्यक्त केला आहे. माझा कट्ट्यावर आमीर खान आणि सत्यजीत भटकळ यांनी अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.


 

आगामी 'दंगल' सिनेमात आमीर खान पैलवान महावीर फोगट यांची भूमिका साकारत आहे. बबिता आणि गीता या महावीर फोगट यांच्या मुली आहेत. महावीर फोगट यांचा  गीता आणि बबिता या दोघींना कुस्ती शिकवण्याचा प्रवास यात उलगडण्यात आला आहे. तर काल पदक जिंकलेली विनेश ही महावीर यांची पुतणी आहे.

 

रिओमध्ये भारताला पहिलंवहिलं पदक, पैलवान साक्षी मलिकला कांस्य


 

बबिता फोगटकडून आशा

गीता आणि बबिता रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यापैकी बबिता आज कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहे. तिचा सामना लाईव्ह पाहणार असल्याचं सांगत ती पदक जिंकेल, असा विश्वास आमीर खानने व्यक्त केला. तर गीताच्या कामगिरीकडेही लक्ष असल्याचं आमीर म्हणाला.


विनेश फोगटची दुखापत दुर्दैवी

यावेळी आमीरने काल ऑलिम्पिकमध्ये पैलवान विनेश फोगटला झालेली दुखापत दुर्दैवी असल्याचं नमूद केलं. विनेशने आपल्याला सुवर्णपदक मिळवून दिलंच असतं, असा विश्वास आमीरने व्यक्त केला.

 

विनेश फोगट या भारतीय महिला पैलवानाला कालच्या कुस्तीदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे ती ऑलिम्पिकबाहेर पडली आहे.

 

माझा कट्टा : शोभा डेंच्या त्या ट्विटबाबत आमीर म्हणतो...


साक्षी मलिकची मॅच रात्री जागून पाहिली

पैलवान साक्षी मलिकने कालच रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. त्याबाबत बोलताना आमीर म्हणाला, "साक्षी उत्तम खेळली. साक्षीची संपूर्ण मॅच मी रात्री जागून पाहिली. साक्षी पिछाडीवर पडल्याने धाकधूक होत होती. पण तिने शेवटच्या क्षणी मुसंडी मारुन जबरदस्त कामगिरी केली आणि भारताला पदक मिळवून दिलं. साक्षीची कामगिरी खूपच उत्तम होती".

 

शोभा डेंकडून रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची थट्टा