मुंबई: ट्रिपल एक्स सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विन डीजल भारतात दाखल झाला आहे. मुंबई विमानतळावर अभिनेत्री दीपिका पदुकोणसह सिनेमाच्या दिग्दर्शकांनी विनचं स्वागत केलं.
दीपिकाने मराठमोळ्या पद्धतीने विनचं स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशा आणि तुतारींचा सूर यावेळी घुमला. नऊवारी साड्या परिधान केलेल्या दुचाकीस्वार महिलाही या स्वागत सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. स्वागताचे सोपस्कार झाल्यानंतर विन हॉटेलकडे रवाना झाला.