बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन गोड बातमी देणार!
एबीपी माझा वेब टीम | 12 Jan 2017 12:19 PM (IST)
मुंबई : अभिनेत्री करीना कपूरने नुकतीच आई बनल्याची बातमी ताजी असताना, बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री लवकरच आई होणार असल्याचं समोर आलं आहे. बोल्ड अॅण्ड ब्युटिफूल अभिनेत्री लिसा हेडन प्रेग्नंट असल्याचं कळतं. स्वत: लिसाने इन्स्टाग्रावर एक फोटो शेअर केला असून त्यात ती प्रेग्नंट असल्याचं दिसंत. ऑक्टोबर 2016 मध्येच लिसा हेडनने बॉयफ्रेण्ड डिनो लालवानीसोबत लगीनगाठ बांधली होती. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये लिसा बिकीनीमधून बेबी बंप दाखवताना दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोला चांगला प्रतिसाद देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लिसा हेडनने आएशा, क्वीन, रास्कल्स, संता बंता प्रायव्हेट लिमिटेड, हाऊसफूल 3 आणि ऐ दिल हे मुश्किल या सिनेमात काम केलं आहे.