अहमदनगर : नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमाने लोकप्रियतेचं शिखर गाठलं असतानाच, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मात्र वेगळंच वक्तव्य केलं आहे. सैराट सिनेमाने तरुण पीढीचं वाटोळं केलं, असं शिवतारे म्हणाले. ते हिवरेबाजार इथं बोलत होते.

 

शिक्षण पूर्ण करुन स्वत:च्या पायावर उभं राहा, मग सैराट व्हा, असा सल्ला शिवतारे यांनी दिला. इतकंच नाही तर अल्पावधित जास्त पैसा कमावण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक सैराटसारखे चित्रपट काढतात, असंही अजब वक्तव्य शिवतारे यांनी केलं.

 

युवकांनी अभ्यास करुन, स्वत:च्या पायावर उभं राहावं, मग सैराट व्हावं, असं शिवतारे म्हणाले.

 

जलसंधारणाची पाहणी

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हिवरे बाजारला भेट दिली. यावेळी त्यांनी परीसरातल्या जलसंधारणाची पाहणी करुन समाधान व्यक्त केलं. भोयरे खुर्द आणि भोयरे पठार या आदर्श गावांनाही भेट देऊन पाहणी केली. यावेळी शिवतारे यांनी पोपटराव पवार आणि ग्रामस्थांची कौतुक केलं.

 

गावच्या विकासाठी नागरिकांना पक्षवीरहित काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. गावपातळीवरील स्थानिक निवडणुकांत द्वेष निर्माण होतो. ग्रामसभांत विकासाऐवजी एकमेकांना अडचणीत आणण्याचं काम सुरु आहे. त्यामुळं योजना असूनही नागरिकांना त्याचा फायदा होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडताना पोलीस बंदोबस्तची तैनात करण्याची वेळ येणं, हे दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या


हैदराबादमध्ये आर्चीच्या उपस्थितीत सैराटचा 'झिंगाट' प्रिमियर  

परदेशातही आता झिंगाट, सैराट लंडनमध्ये प्रदर्शित होणार


'सैराट'मुळे 'द कपिल शर्मा शो' TRP मध्ये अव्वल !


व्हायरल सत्य : आर्ची अर्थात रिंकूला शाळेतून काढणार?


बिहारमधील मराठी 'सिंघम' लवकरच महाराष्ट्र पोलीस दलात


चारा छावण्या बंदीचा निर्णय कोणत्या *** ने घेतला, शिवतारेंची जीभ घसरली