Vijay Sethupathi: दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपतीचा (Vijay Sethupathi) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. विजय हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटामध्ये विजय हा प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. विजयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. विजय सध्या त्याच्या चित्रपटामुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. विजयनं त्याचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमधील त्याचा लूक पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले. अनेकांनी विजयच्या या ट्रान्सफॉर्मेशनचं कौतुक केलं आहे.
विजयचा लूक पाहून नेटकरी आश्चर्यचकित
विजयनं त्याचा एक मिरर सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. त्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये विजय हा व्हाईट शर्ट आणि चष्मा अशा लूकमध्ये दिसत आहे. विजयनं या फोटोला काही कॅप्शन दिलं नाही तसेच विजयनं त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनबाबद देखील माहिती दिलेली नाही पण विजयचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकरी आश्चर्यचकित झाले.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
फोटोला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी विजयच्या या लूकचं कौतुक केलं आहे. 'विजय या फोटोमध्ये हँडसम दिसत आहे. ' अशी कमेंट एका युझरनं केली. तर एक नेटकरी विजयला ओळखूच शकला नाही. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'विजयचं अकाऊंट हॅक झालं आहे का?'
विजयचे आगामी प्रोजेक्ट्स
विजय हा शाहरुखच्या जवान या आगामी चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. शाहिद कपूरच्या फर्जी या वेब सीरिजमध्ये विजय हा महत्वाची भूमिका साकारणार आहे. त्याचा मेरी क्रिसमस हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Jawan : शाहरुखच्या 'जवान' चित्रपटासाठी विजय सेतुपतीनं घेतलं एवढं मानधन; आकडा ऐकून व्हाल अवाक्!