Liger Box Office Collection : साऊथ स्टार, अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याने ‘लायगर’ (Liger) या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. विजय देवरकोंडाचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट असल्याने या चित्रपटाकडून खूप आशा होत्या. मात्र, अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करताना दिसत नाहीय. विजय आणि अनन्या (Ananya Panday) या दोघांनीही त्यांच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. मात्र, नंतर या चित्रपटावरही बॉयकॉटची मागणी सुरु झाली. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली आहे. तर, या कमाईत दिवसेंदिवस सातत्याने घट होत आहे.


नुकतेच ‘लायगर’चे पाचव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. कलेक्शनमध्ये झालेली मोठी घसरण पाहता हा चित्रपट काही दिवस देखील चित्रपटगृहात टिकून राहणे कठीण होईल, असे म्हणता येईल.


पाचव्या दिवशी अवघी इतकी कमाई


मीडिया रिपोर्टनुसार सोमवारी ‘लायगर’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये (Liger Box Office Collection) मोठी घसरण झाली आहे. चित्रपटाने पाचव्या दिवशी अवघ्या 2.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. रविवारीही भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली होती. विजयच्या या चित्रपटाच्या कलेक्शनवर या सामन्याचा मोठा प्रभाव पडला होता.


'लायगर' हा चित्रपट पाच भाषांमध्ये देशभरातील सुमारे 2,500 स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. असे असूनही हा चित्रपट कमाईच्या बाबतीत फारसा जादू दाखवू शकलेला नाही. ‘लायगर’ या चित्रपटाने 16 कोटींची जबरदस्त ओपनिंग केली होती, त्यामुळे चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. मात्र, आता आकडे पाहता हा चित्रपट प्रेक्षकांवर आपली जादू दाखवू शकलेला नाही, हे लक्षात येते. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित 'लायगर' हा चित्रपट जवळपास 125 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला आहे. यानुसार कलेक्शनचे आकडे बघितले तर, बजेट देखील परत मिळणे अवघड वाटते आहे. विजय देवरकोंडा या चित्रपटात बॉक्सरच्या भूमिकेत दिसला आहे. तर, अनन्या पांडेने मुख्य भूमिका साकारली आहे.


बॉयकॉट ट्रेंडचा परिणाम


‘लायगर’ रिलीज होण्यापूर्वीच सोशल मीडियामध्ये त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची (Boycott trend) मागणी करण्यात आली होती. ‘बॉयकॉट लायगर’ म्हणत लोकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. त्याचा परिणाम आता चित्रपटाच्या कलेक्शनवर देखील दिसून आला आहे. तर, विजयच्या बॉलिवूड डेब्यूची वेळ चुकली, असे देखील चाहते म्हणत आहेत. ‘लायगर’ हा पॅन इंडिया चित्रपट पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाद्वारे विजय देवरकोंडा याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. प्रसिद्ध माजी अमेरिकन बॉक्सर माईक टायसननेही 'लायगर'मध्ये काम केले आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: