मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढाने 'मॅक्सिम' मॅगझिनसाठी बिकिनी फोटोशूट केलं. या मॅगझिनच्या कव्हरपेजवर रिचा दिसणार आहे. या फोटोशूटचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.   अभिनेत्री रिचा चढ्ढा 27 मे रोजी रिलीज होणारी 'कॅबरे'मध्ये बोल्ड भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या रिलीजआधी रिचा एका सेक्सी लूकमध्ये समोर आली आहे.   हे फोटोशूट रिचाने स्विमिंग पूलमध्ये केलं आहे. आगामी 'कॅबरे' सिनेमात रिचा चढ्ढा प्रमुख भूमिकेत असून, हा सिनेमा हेलन यांच्या जीवनावर आधारित असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमासाठी रिचाने प्रचंड मेहनत घेतली आहे.   मॅक्सिमच्या मे महिन्याच्या एडिशनच्या कव्हरपेजवर रिचा दिसत आहे. याआधी मॅक्सिमच्या सप्टेंबर 2014 च्या अंकाच्या कव्हरपेजवरही रिचा दिसली होती.   'गँग्ज ऑफ वासेपूर' सिनेमातून रिचा लोकप्रिय झाली आहे. त्यानंतर मसान सिनेमातील भूमिकेमुळेही तिचं मोठं कौतुक झालं होतं. मात्र, 'मैं और चार्ल्स' सिनेमा काही खास छाप पाडू शकला नाही. ‘सरबजित' सिनेमातही रिचाचा अभिनय पाहायला मिळणार आहे.   पाहा व्हिडीओ :