मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री फिटनेसच्या बाबतीत कायम सतर्क असतात. अभिनेत्री कतरिना कैफही नेहमी व्यायाम करतो. जीममध्ये मात्र ती ट्रेनरच्या भूमिकेत दिसून आली. अभिनेत्री आलिया भट्टला तिने ट्रेनिंग दिली.


कतरिना कैफने या ट्रेनिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती जीम ट्रेनर नसल्यामुळे आलियाला ट्रेनिंग देताना दिसत आहे.


आलियने नुकतीच तिच्या आगामी राजी या सिनेमाची शुटिंग पूर्ण केली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजारने केलं आहे. तर कतरिना कैफ सलमान खानसोबत टायगर जिंदा है या सिनेमात दिसणार आहे.