Chava Release Date postponed: सध्या मनोरंजन चाहत्यांना अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 :द रुल या सिनेमाची प्रतीक्षा आहे . दरम्यान, डिसेंबर 2024 ला प्रदर्शित होणाऱ्या विकी कौशलचा ऐतिहासिक छावा चित्रपटाचीही मोठी चर्चा होती . पण आता छावा चित्रपटांच्या निर्मात्यांनी या सिनेमाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलली आहे . त्यामुळे पुष्पा 2 शी होणाऱ्या संघर्ष आता टळला असल्याची चर्चा आहे . 5 डिसेंबरला देशभरातील सिनेमागृहांमध्ये पुष्पा 2 द रुल रिलीज होणार आहे . पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या पार्टला मिळालेल्या प्रतिसादानंतर या सिनेमाला तुफान फॅन फॉलोइंग आहे . दरम्यान विकी कौशलची प्रमुख भूमिका असणारा छावा चित्रपटही डिसेंबर 2024 मध्ये प्रदर्शित होणार होता . पण या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता छावाची रिलीज डेट पुढे ढकलत पुष्पा 2 शी संघर्ष टाळला आहे . बुधवारी संध्याकाळी तरण आदर्श यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून छावा चित्रपटाच्या रिलीज डेट विषयी माहिती दिली.
कधी होणार छावा रिलीज?
विकी कौशल रश्मिका अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या छावा चित्रपट डिसेंबर 2024 मध्ये प्रदर्शित होणार होता . पण या चित्रपटाचे निर्माते तरण आदर्श यांनी छावाच्या नवीन रिलीज डेट विषयी ट्विट करत माहिती दिली . छत्रपती शिवाजी महाराजांच्या 19 व्या जयंतीचे महत्त्व लक्षात घेत 14 फेब्रुवारी 2025 रोजी छावा चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे . दिनेश विजन यांची निर्मिती . लक्ष्मण उटेकर यांचे दिग्दर्शन आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणाऱ्या विकी कौशलची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट दोन महिने लांबवण्यात आल्याचं तरण आदर्श यांनी सांगितलं .
रश्मीकासाठी आपल्याच दोन्ही चित्रपटांचा संघर्ष टळला
छावा सुरुवातीला 6 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार होता . पण त्याआधीच पुष्पा टू देशभरात रिलीज झाल्यानंतर छावाच्या व्यावसायिक कमाईला गंभीर धक्का बसेल अशी अटकळ होती . त्यामुळेच कदाचित निर्मात्यांना छावा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलणेच सोयीचे ठरले असल्याची चर्चा होत आहे . अल्लू अर्जुन चा या तेलगू ॲक्शन ड्रामाची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे . या चित्रपटात अल्लू अर्जुन , फहद फासील , रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत . दरम्यान छावा चित्रपटातही रश्मिका महत्त्वाची भूमिका साकारत आहे . त्यामुळे आपलेच दोन चित्रपट एकमेकांसमोर पहावे लागण्याचा प्रसंग टळला आहे.
छावाची कथा काय ?
छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर चित्रित करण्यात आलेला चरित्रात्मक सिनेमा आहे . यामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे तर अक्षय खन्ना मुघल सम्राट औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे .