Ananya Pandey: बॉलिवूडमध्ये अनन्या पांडे आणि चंकी पांडे या बाप लेकीची जोडी चांगलीच प्रसिद्ध आहे. स्टारकिड्सला सिनेमातून लाँच करणाऱ्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर २ मधून अनन्यानं पदार्पण केलं होतं. अलिकडेच खो गये हम कहाँ, कॉल मी बे,CTRL अशा चित्रपटांमध्ये झळकलेली अनन्या सिनेसृष्टीत वाहवा मिळवत आहे. पण स्वत:च्या मेहनतीवर कितीही नाव कमावलं तरी स्टारकीड्सच्या बाबतीत नेपोटिझमचा एक शिक्का बसतोच. बॉलिवूडमध्ये इनसाईडर आऊटसाईडर हा विषय कायमच गाजलेला. आजवर बऱ्याच कलाकारांच्या मुलांनी यावर आपलं मत मांडलं आहे. पण 'स्टार कीड' या टॅगला दूर करताना नुकतंच अनन्यानं एका मुलाखतीत स्टार कीड असणं वाईट नसल्याचं सांगत मला याचं वाईट वाटत नाही असं अनन्या म्हणाली आहे.शामानीच्या पोडकास्टवर ती बोलत होती.


स्टारकिड असल्याचा अपमान वाटत नाही


बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने अलीकडेच ‘स्टारकिड्स’ या बॉलिवूडच्या कायम चर्चेत असलेल्या विषयावर बातचीत केलीय. ती म्हणाली, “लोकांनी स्टारकिड हा शब्द वाईट किंवा अपमान केल्यासारखा बनवला आहे. पण मला वाटतं, हे योग्य नाही. लोक फक्त हे पाहतात की कोणत्या स्टारची मुलगी किंवा मुलगा आहे. त्याऐवजी त्यांनी त्या व्यक्तीचं काम पाहायला हवं.”  शाहरुख खानचं उदाहरण दिलं ती म्हणाली, “तो आपल्या देशाचा सर्वात मोठा स्टार आहे, पण तो चित्रपट व्यवसायात काम करणाऱ्या कुटुंबातून आलेला नाही. त्यामुळे यश हे फक्त तुम्ही कोणत्या घरातून आला आहात यावर ठरत नाही, तर तुम्ही किती मेहनत करता यावर ठरतं.”


स्टारकिड्स असल्यानं हेातो फायदा


 स्टारकिड्सच्या टॅगमुळे होणाऱ्या फायद्यांवरही अनन्या बोलली, पण हा शब्द ज्या पद्धतीने अपमानासारखा वापरला जातो याचं वाईट वाटतं असं ती म्हणाली.“या व्यवसायानं आणि प्रेक्षकांनी आम्हाला खूप काही दिलं आहे. पण इनसाइडर-आउटसाइडर वाद फार तोडफोड करणारा आहे.” असं अनन्या म्हणाली.


जेंव्हा चंकी पांडेंना काम नव्हतं.. अनन्यानं सांगितलं..


चंकी पांडेच्या करिअरमधील संघर्षाचा खुलासाही अनन्यानं केला. ती म्हणाली, चंकी पांडे त्यांच्याकडे काम नसल्यानं खूप वेळ घरातच बसायचे, लोकही त्यांच्या घराबाहेर त्यांची झलक पाहायला येत नव्हते. अनन्या म्हणाली, तिचा जन्म  चंकीचा करिअर खूपच मंदावला होता त्या वेळी झाला. यापूर्वी अनन्यानं "कॉफी विथ करण" शोमध्ये चंकी पांडेला कधीही आमंत्रित केलं जात नव्हतं, असं सांगून वाद निर्माण केला होता. अनन्या म्हणते की, चंकीने त्याच्या करिअरमधील चढ-उतार पाहून तिला यश आणि अपयश कसे स्वीकारायचे याचे महत्त्व शिकवले.