पुणे: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ रंगकर्मी नंदू पोळ यांचं आज सकाळी निधन झालं. पुण्यातील प्रयाग रुग्णालयात गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


 

पोळ यांनी 'घाशीराम कोतवाल' या नाटकात तसंच सामना, गाढवाचं लग्न या चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

 

वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे बालवयातच नंदू पोळ यांनी 'साष्टांग नमस्कार' नाटकापासून अभिनयाचा प्रवास सुरू केला. तसेच ते 'थिएटर अकॅडमी'चेही एक संस्थापक-सदस्य होते. तसंच ते ध्वनिमुद्रण तंत्रज्ञही होते. त्यासाठी त्यांनी स्वत:चा स्टुडिओ काढला होता.