Ved Movie : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा 'वेड' (Ved) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट लवकरच 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. आता वेड या चित्रपटाच्या टीमने या चित्रपटाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. रितेशने एक व्हिडीओ शेअर करुन याबाबत प्रेक्षकांना सांगितलं. 


रितेश देशमुख याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन वेड चित्रपटाच्या एक्सटेंडेट व्हर्जनबाबत सांगितलं. तो म्हणाला की, "वेड या चित्रपटाला तुम्ही सर्वांनी भरभरुन प्रेम दिल्याबद्दल मी आणि टीम 'वेड' तुमचे आभार मानतो. आम्ही जेव्हा वेड चित्रपटाचं प्रमोशन करत होते तेव्हा अनेकांनी आम्हाला विचारलं की, सत्या आणि श्रावणी यांचे रोमँटिक गाणं कुठं आहे? त्यानंतर आम्हाला वाटलं की, अजूनही वेळ गेली नाही आपण नवं गाणं रेकॉर्ड करुन चित्रपटात वापरु शकतो. आम्ही वेड तुझे हे गाणं सत्या आणि श्रावणीवर शूट केलं आहे. तुमच्या आवडत्या पात्रांचं हे गाणं तुम्हाला 20 तारखेपासून चित्रपगृहात पाहता येणार आहे."


चित्रपट करण्यात आले हे बदल


रितेशने पुढे सांगितलं की, "वेड चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत." तो म्हणाला की, 'काही लोक आम्हाला म्हणत होते की, सलमान भाऊचं गाणं चित्रपटाच्या शेवटी आहे, ते चित्रपटाच्यामध्ये असलं पाहिजे तर आता ते गाणं चित्रपटाच्यामध्ये आहे. तसेच सत्या आणि त्याचे वडील, श्रावणी आणि अशोक मामा यांचे काही नवे सीन्स देखील चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे 20 जानेवारीपासून तुम्ही वेड या चित्रपटाचं एक्सटेंडेट व्हर्जन चित्रपट गृहात पाहू शकता." शुक्रवारी सिनेमा लव्हर्स-डे आहे. याननिमित्ताने तुम्ही 99 रुपयांमध्ये वेड चित्रपट पाहू शकता. '


पाहा व्हिडीओ: 






वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, सुख कळले, बेसुरी या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Ved Box Office Collection: रितेश- जिनिलियाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; 'वेड' चं कलेक्शन माहितीये?