Riteish Deshmukh Movie Ved:  आज दिवाळी पाडवाचे औचित्य साधून अभिनेता आणि आता दिग्दर्शनाची भूमिका साकारणाऱ्या  रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) त्याच्या वेड (Ved) या आगामी चित्रपटचं  पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये या चित्रपटाचे तीन पोस्टर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये रितेशसोबतच जेनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) देखील दिसत आहे.  


रितेशनं शेअर केली पोस्ट
रितेशनं वेड चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहिर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय वेड चित्रपटाचा फर्स्ट लुक. आमचं वेड तुमच्यापर्यंत येतंय 30 डिसेंबरला. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या.' रितेशनं शेअर केलेल्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 






20 वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेड  या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः  रितेश देशमुख करणार आहे तसेच विशेष बाब म्हणजे  या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनिलिया देशमुख मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. यापूर्वी जेनेलियानं हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल पाच भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अभिनेत्री  जिया शंकर  या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहे . हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 


सलमान खान करणार काम


सलमान खान वेड या चित्रपटात काम करणार आहे. काही महिन्यांपूर्वी वेड चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो रितेशनं सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये तो सलमानसोबत सेटवर मजा करताना दिसत आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Riteish Deshmukh : 'पांडुरंगाच्या साक्षीनं मी...'; आषाढी एकादशीनिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट