Varun Tej Lavanya Tripathi Engagement : दाक्षिणात्य अभिनेता वरुण तेज (Varun Tej) आणि लावण्या त्रिपाठीचा (Lavanya Tripathi) नुकताच साखरपुडा पार पडला आहे. वरुणच्या हैदराबाद येथील घरी त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. या साखरपुड्याला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

Continues below advertisement

लावण्या त्रिपाठी आणि वरुण तेजच्या साखरपुड्याला अनेक दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अल्लू अर्जुन (Allu Arjun), राम चरण (Ram Charan) आणि सुपरस्टार चिरंजीवीने (Chiranjeevi) साखरपुड्याला हजेरी लावत लावण्या आणि वरुणला शुभेच्छा दिल्या आहेत. आता लवकरच लावण्या आणि वरुण लग्नबंधनात अडकणार आहेत.

लावण्या आणि वरुण शेअर केला रोमँटिक फोटो; कॅप्शनने वेधलं लक्ष

लावण्या आणि वरुणने सोशल मीडियावर त्यांचे साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत वरुणने लिहिलं आहे,"माझं प्रेम मला मिळालं". तर लावण्याने लिहिलं आहे,"2016 मध्ये मला माझं प्रेम मिळालं आहे". लावण्याच्या या पोस्टने हे स्पष्ट होतं की 2016 पासून ती वरुणला डेट करत आहे. गेल्या काही दिवसांपासून लावण्या आणि वरुणच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण दोघांनीही कधी याबद्दल भाष्य केलं नाही. अखेर साखरपुडा करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. वरुण आणि लावण्याच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Continues below advertisement

वरुण तेज हा अभिनेता-निर्माता नागेंद्र बाबू यांचा मुलगा आहे. तसेत तो चिरंजीवी आणि पवन कल्याणचा भाचा आहे. तर लावण्यादेखील दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'अंदाला राक्षसी' या सिनेमाच्या माध्यमातून 2012 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 2017 साली आलेल्या 'मिस्टर' या सिनेमाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली. 'मिस्टर' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान वरुण आणि लावण्याची चांगली मैत्री झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आता ते लग्नबंधनात अडकले आहेत. साखरपुड्यानंतर त्यांच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वरुण आणि लावण्या लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांसह बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील हजेरी लावणार आहेत.

संबंधित बातम्या

Varun Tej Engagement : वरुण तेजचा 'या' दिवशी गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठीसोबत होणार साखरपुडा; राम चरण अन् चिरंजीवीची हजेरी