Adipurush Advance Ticket Bookings : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात होणार आहे. तर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या सिनेमाचे 10,000 तिकिटे विकत घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


रणबीर कपूर 'आदिपुरुष' कोणाला दाखवणार? (Ranbir Kapoor book Adipurush 10,000 tickets) 


'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा हिंदीत 4000 पेक्षा अधिक स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार आहे. तर देशभरात हा सिनेमा 6200 स्क्रिन्सवर रिलीज होणार आहे. उद्यापासून (10 जून 2023) या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात होणार आहे. तर रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) या सिनेमाचे दहा हजार तिकीट विकत घेणार आहे. अनाथ मुलं आणि काही खास चाहत्यांना तो हा सिनेमा दाखवणार आहे.  






'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी 100 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. 600 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता 'आदिपुरुष' किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files), पठाण (Pathaan), द केरळ स्टोरी (The Kerala Story), आणि 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमांनी गेल्या काही दिवसांपूर्वी चांगली कमाई केली आहे. आता या यादीत 'आदिपुरुष' सिनेमाचादेखील समावेश होणार आहे. 


'आदिपुरुष' सिनेमाबद्दल जाणून घ्या... (Adipurush Movie Details)


'आदिपुरुष' या सिनेमात प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेत आहे. तसेच सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंह आणि हनुमानच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे दिसणार आहे. 'रामायणा'वर आधारित असलेला हा सिनेमा 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'आदिपुरुष' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचं यू सर्टिफिकेट मिळालं आहे. 'आदिपुरुष'चं पोस्टर, ट्रेलर आणि गाणी पसंतीस उतरल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


संबंधित बातम्या


Adipurush: ओम राऊत आणि क्रिती सेनन यांच्या 'गुडबाय किस' प्रकरणावर रामायण फेम अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...