वरुण धवन बोहल्यावर चढणार?
एबीपी माझा वेब टीम | 12 Nov 2018 12:30 PM (IST)
बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. दीपिका पादुकोण व रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स पुढच्या महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. यामध्ये आता अभिनेता वरुण धवनची भर पडणार आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. सोनम कपूर आणि त्यानंतर नेहा धुपिया या दोघींनी नुकतीच त्यांची लग्नं उरकून घेतली. त्यानंतर आता दीपिका पादुकोण व रणवीर सिंग 14,15 नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहेत. शिवाय प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सचेही लग्न पुढच्या महिन्यात होईल. यामध्ये आता अभिनेता वरुण धवनची भर पडणार आहे. वरुणने त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबतच्या नात्याबाबत नुकताच खुलासा केला आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमात वरुण मोकळेपणाने बोलला. करणने वरुणला विचारले की, नताशासोबत तू लग्न करणार आहेस का? यावर उत्तर देताना वरुण म्हणाला, हो मी नताशासोबत लवकरच लग्न करणार आहे. नताशा आणि वरुण अनेकदा एकत्र दिसतात. सोनम कपूरच्या लग्नात वरुण नताशासोबत आला होता. नुकतीच दोघांनी एकत्र दिवाळी साजरी केली. त्यावेळी दोघांनी एकत्र फोटोजदेखील काढले, एक फोटो वरुणने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मागच्या वर्षी वरुण धवनने मुंबईत एक शानदार घर खरेदी केले. त्या घरामध्ये सर्वात पहिल्यांदा नताशानेच प्रवेश केला होता. त्यावेळी वरुण नताशासोबत लवकरच लग्न करुन नव्या घरात शिफ्ट होईल अशा बातम्या पसरल्या होत्या.