मुंबई : आमीर खान आणी अमिताभ बच्चन यांचा बहुप्रतिक्षीत 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये झळकला. या चित्रपटाची समीक्षकांनी मोठ्या प्रमाणात निंदा केली असली तरी, आमीरच्या चाहत्यांनी समीक्षकांना चांगलेच उत्तर दिले आहे. 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ने पहिल्याच दिवशी तब्बल 52.25 कोटी रुपयांची केल्यानंतर तीन दिवसांमध्ये 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.


आमीरच्या 'ठग्ज'ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियावर या चित्रपटावर आणि चित्रपट पाहणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मिम्स व्हायरल होत आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक 52 कोटी रुपयांची कमाई करुनही दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन निम्म्याहूनही कमी झाले आहे.


ठग्जने शुक्रवारी 28.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर शनिवारी चित्रपट अजून घसरला आहे. शनिवारी चित्रपटाने 22.75 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाला तमिळ आणि तेलुगू भाषेतदेखील बरा प्रतिसाद मिळत आहे.