वरुण धवन यंदा लग्नाच्या बेडीत अडकणार
एबीपी माझा वेब टीम | 01 Jan 2018 04:00 PM (IST)
अखेर वरुणने नताशाचं म्हणणं ऐकलं. त्याने आई-वडिलांच्या घराजवळच नवं घर घेतलं आहे.
मुंबई : अभिनेता वरुण धवनसाठी नवं वर्ष खूपच स्पेशल असणार आहे. कारण या वर्षी तो लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गर्लफ्रेण्ड नताशा दलालसोबत तो लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. फॅशन डिझायनर नताशा दलाल आणि त्याच्या नात्याची बॉलिवूडमध्ये चर्चा होती. मे किंवा जून महिन्यात दोघे बोहल्यावर चढण्याची शक्यता आहे. वरुण धवनने नुकतंच आई-वडिलांचं घर सोडून स्वत:चं घर घेतलं आहे. खरंतर वरुणला आई-वडिलांसोबतच राहायचं होतं. पण लग्नानंतर वेगळ्या घरात राहण्याची नताशाची इच्छा होती. यावरुनच दोघांमध्ये वादही झाले होते. अखेर वरुणने नताशाचं म्हणणं ऐकलं. त्याने आई-वडिलांच्या घराजवळच नवं घर घेतलं आहे. वरुण लवकरच सुजीत सरकारच्या 'ऑक्टोबर' सिनेमात दिसणार आहे. सध्या तो 'सुई-धागा- मेड इन इंडिया'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात त्यासोबत अनुष्का शर्मा झळकणार आहे.