Varun Dhawan Health Update : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) गेल्या काही दिवसांपूर्वी वेस्टिब्युलर हायपोफंक्शन (Vestibular Hypofunction) या आजाराचा सामना करत असल्याची चाहत्यांना माहिती दिली असून आता चाहत्यांचे आभार मानले आहेत.
वरुण 'वेस्टिब्युलर हायपोफंक्शन' या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्येतीची माहिती देत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने ट्वीट केलं आहे,"मित्रांनो, एका मुलाखतीत मी माझ्या आजारावर भाष्य केलं. तेव्हापासून तुम्ही मला काळजी घेण्याचा सल्ला देत आहात. तुमचं प्रेम आणि भक्कम पाठिंब्यामुळेच मी या परिस्थितीचा सामना करू शकतो".
वरुणला झालेला 'वेस्टिब्युलर हायपोफंक्शन' आजार काय आहे?
'वेस्टिब्युलर हायपोफंक्शन' म्हणजे कानाच्या आतील शिल्लक प्रणाली जी योग्यरित्या कार्य करत नाही. कानाच्या आत वेस्टिब्युलर प्रणाली आहे जी डोळ्यासह कार्य करते आणि स्नायू संतुलित करण्याचा प्रयत्न करते. जेव्हा ते नीट काम करत नाही, तेव्हा कानातून ऐकलेल्या गोष्टी मेंदूपर्यंत नीट पोहोचत नाहीत. अशा स्थितीत व्यक्तीला चक्कर येऊ लागते. पहिल्या 1-2 दिवसात चक्कर येणे आणि घबराटपणाची लक्षणे अधिक तीव्र असतात. तीन आठवड्यांनंतर रुग्ण सामान्य स्थितीत परत येतात. परंतु काही रुग्णांमध्ये डोके काही वेगाने हलवल्यानंतर काही महिने असंतुलन आणि उलटीची लक्षणे प्रभावी राहतात.
वरुणचे आगामी सिनेमे
वरुण आणि क्रिती सेननचा 'भेडिया' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या हॉरर-कॉमेडी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 25 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच नितेश तिवारी दिग्दर्शित 'बावल' सिनेमात वरुण झळकणार आहे. या सिनेमात वरुण जान्हवी कपूरसोबत दिसणार आहे. 7 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या