Urfi Javed: अभिनेत्री  उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या  चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वॉर सुरु आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती. त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं होतं.  'उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा' अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर उर्फी ही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा सधात आहे. नुकतीच उर्फीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 


उर्फी जावेदची पोस्ट:


उर्फीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं,  'मला माहित आहे की राजकारण्यांच्या विरोधात अशा पोस्ट अपलोड करणे खूप धोकादायक आहे, परंतु अशा लोकांमुळे मी आत्महत्येचा विचार करत आहे.  मी कधीही कोणाचेही वाईट केले नाही. ते विनाकारण माझ्या मागे लागले आहेत.'



दुसऱ्या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'या त्याचं महिला आहेत ज्या राष्ट्रवादीत असताना संजय राठोड यांच्या अटकेसाठी ओरडत होत्या. यानंतर त्यांचे पती लाच घेताना पकडले गेले, त्यामुळे त्यांनी पतीला वाचवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर संजय राठोड आणि चित्रा वाघ हे दोघे खूप चांगले मित्र झाले. मी देखील भाजपमध्ये प्रवेश करते, मग आपण चांगले मित्र होऊ'



उर्फीच्या विरोधात मुंबईतल्या महिला सामाजिक संस्था आक्रमक झाल्या आहेत. उर्फी ही सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करत आहे. त्यामुळे समाजातील तरुण मुले मुली यांच्यावर प्रभाव पडत आहे. त्यामुळे तिच्या विरोधात सक्त कारवाई करावी, अशी मागणी या सामाजित संस्थांनी केली आहे.  


तसेच गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ या देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन उर्फीच्या फॅशनवर टीका करत आहेत. 'मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे मा. मुंबई पोलीस आयुक्तांची तसेच सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली.' असं ट्वीट काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी केलं होतं.


चित्रा वाघ यांनी उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. 'शी…ऽऽऽऽ अरे..हे काय चाललयं मुंबईत. रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही, तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होत आहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतीये.' असं कॅप्शन चित्रा वाघ यांनी व्हिडीओला दिलं होतं. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Urfi Javed: 'चित्रा वाघ, तुमच्या पक्षातील....'; दिल्लीमधील घटनेतील पीडितेच्या आईचा व्हिडीओ उर्फीनं केला शेअर