Akshaya Deodhar : अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यानंतर पाठकबाईंची खऱ्या आयुष्यातील सासू नक्की कशी आहे याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 


अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. पण यातील एका फोटोने मात्र नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या फोटोत अक्षयासोबत एक महिला दिसत आहे. त्यामुळे आता ही महिला कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर ही महिला दुसरी-तिसरी कोणी नसून अक्षयाची सासू आहे. 


अक्षयाची सासू खूपच साधी आहे. मनमिळाऊ स्वभावाने तिने अक्षयाला आपलंसं केलं आहे. अक्षयाच्या सासूचे नाव गौरी जोशी असे आहे. गौरी जोशी अक्षयाला आपल्या लेकीप्रेमाणे प्रेम देत आहेत. अक्षया खऱ्या आयुष्यात हार्दिकची पत्नी व्हावी अशी गौरी जोशी यांची इच्छा होती, असं हार्दिक एका मुलाखतीत म्हणाला होता. 






गेल्या महिन्यात अक्षया आणि हार्दिकचा पुण्यात लग्नसोहळा पार पडला. मेहेंदी, संगीत, हळद आणि लग्नसोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अक्षयाच्या साडीपासून ते हार्दिकच्या मेंहेंदीपर्यंत अनेक गोष्टी नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरल्या. 


'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर मुख्य भूमिकेत होते. त्यांची ही मालिका आणि राणा दा आणि पाठक बाईंची जोडी प्रचंड गाजली. या मालिकेच्या माध्यमातून दोघे घराघरांत पोहोचले. खऱ्या आयुष्यातही त्या दोघांनी लग्न करावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी साखरपुड्याचा फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.


संबंधित बातम्या


Akshaya Deodhar: लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर अक्षयानं शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, 'मी तयार नव्हते'