Sonalee Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा असं सोनालीला म्हटलं जातं. सोनाली तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. आता सोनालीनं तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. सोनालीनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. सोनालीनं मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आता सोनाली मल्याळम भाषेतील चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची माहिती सोनालीनं सोशल मीडियावर दिली. 

Continues below advertisement


सोनालीची पोस्ट


सोनालीनं तिच्या मलईकोट्टई वलीबन या मल्याळम भाषेतील आगामी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. या पोस्टरला तिनं कॅप्शन दिलं, 'नवीन वर्ष, नवी यात्रा, नवा प्रदेश माझे हे वर्ष खरोखरच आशादायक दिसत आहे.  मला मला अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या  लिजो जोस पेलिसरी यांच्या  मलईकोट्टई वलीबन (Malaikottai Valiban) या मल्याळम  चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळत आहे.' मलईकोट्टई वलीबन  या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल यांच्यासोबत सोनाली काम करणार आहे.


सोनालीच्या पोस्टला नेटकऱ्यांच्या कमेंट्स


अनेक नेटकऱ्यांनी सोनालीच्या या पोस्टला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच  प्रार्थना बेहरे, सिद्धार्थ जाधव, संजय जाधव  या सेलिब्रिटींनी देखील सोनालीच्या या पोस्टला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या.  






सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. अप्सरा आली या गाण्यामधील सोनालीच्या नृत्यशैलीचं अनेकांनी कौतुक केलं. सोनाली ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Sonalee Kulkarni : 'तुमच्याकडे पण गुड न्यूज आहे का?'; नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला सोनालीचं मजेशीर उत्तर