Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या कामांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. हटके फॅशन स्टाईलने ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. 'फॅशन क्वीन' आता तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. नव्या लूकमध्ये उर्फीला दुखापत झालेली दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दुखापत लपवण्यासाठी अभिनेत्रीने मेकअप केलेला दिसत आहे. तिच्या या कृतीने नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलच ट्रोल केलं आहे.


उर्फीचा नवा लूक (Urfi Javed New Look) 


उर्फी जावेदचा नवा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्रीने काळ्या रंगाचा हटके ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. नव्या लूकमध्ये फॅशनक्वीन तिचा एक पाय फ्लाँट करताना दिसत आहे. तसेच तिने गळ्यात एक लक्षवेधी बँड घातला आहे. उर्फी जावेदचे किलर लूकमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 






उर्फी जावेदचा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या फोटो आणि व्हिडीओमध्ये अभिनेत्री गोड हसताना दिसत आहे. तिच्या हास्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी मात्र तिला चांगलच ट्रोल केलं आहे. उर्फीने जखम लपवण्यासाठी मेकअपचा अवलंब केला आहे. या कृतीमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.


उर्फी जावेद कोण आहे? (Who Is Urfi Javed)


उर्फी जावेद छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'बडे भैय्या की दुल्हनिया' मालिकेमध्ये 'अवनी', 'मेरी दुर्गा'मध्ये 'आरती' आणि 'बेपनाह' मध्ये 'बेला' तसेच 'पंच बीट सीझन-2' मध्ये 'मीरा' नावाने विविध प्रकारच्या भूमिका निभावल्या आहेत. तिने साकारलेल्या सर्वच भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 


उर्फी जावेदने 2016 मध्ये 'बडे भैय्या की दुल्हनिया' या मालिकेच्या माध्यमातून मालिकाप्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक लोकप्रिय मालिकांत काम केलं. 2020 मध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत तिने साकारलेली शिवानी भाटियाची भूमिका चांगलीच गाजली. उर्फी 2021 मध्ये 'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमात सहभागी झाली होती. हटके फॅशन स्टाईलमुळे उर्फीवर टीका होत असली तरी याकडे दुर्लक्ष करत ती आपल्या कामावर फोकस ठेवत आहे. 


संबंधित बातम्या


Urfi Javed New Look : कलरफुल आऊटफिट अन् गाड्यांचा बेल्ट; उर्फीचा अतरंगी-सतरंगी अंदाज, लूकनं वेधलं लक्ष