Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहलीची (Virat Kohli) जोडी सध्या चर्चेत आहे. अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची असल्याची सोशल मीडियावर रंगली आहे. विरुष्काला मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर स्पॉट करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. आता दुसऱ्या बाळाचं स्वागत केल्यानंतर अनुष्का शर्मा मनोरंजनसृष्टीतून ब्रेक घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.


अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. पण विरुष्काने मात्र अद्याप चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिलेली नाही. अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या बातम्यांदरम्यान तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री कुटुंब आणि मुलांबाबत भाष्य करताना दिसत आहे.






अनुष्का शर्माचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सिमी अग्रवाल रेंडेझ्वस नामक लोकप्रिय चॅट शोमध्ये मुलाखत देताना दिसत आहे. या मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने लग्न, मुलं, संसार आणि आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या पैलूंवर भाष्य करताना दिसत आहे. अनुष्का म्हणते आहे,"लग्न माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मुलं झाल्यानंतर कदाचित मी काम करणं थांबवेल". अनुष्काचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 


अनुष्का शर्माने 2021 मध्ये वामिकाला जन्म दिला. सध्या अभिनेता 'चकदा एक्सप्रेस' (Chakda Xpress) या सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिषेक बॅनर्जी लिखित या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही. अनुष्काचा 'झिरो' (Zero) हा सिनेमा काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अनुष्का बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण आता ती ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने अभिनेत्रीचे चाहते नाराज झाले आहेत. 


अनुष्काचा सिनेप्रवास (Anushka Sharma Movies)


अनुष्काने 'रब ने बना दी जोडी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आजवर अनेक सुपरहिट सिनेमांचा अभिनेत्री भाग आहे. तिने बँड बाजा बारात,जब तक है जान,दिल धडकने दो यांसारख्या अनेक सिनेमांत काम केलं आहे. आता तिच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Anushka Sharma Second Pregnancy: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्यांदा होणार आई-बाबा?