मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या ब्रेकअप आणि घटस्फोटांची लाट आल्याने अनेक चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यातच 'बिग बॉस'मध्ये गाजलेलं कपल अभिनेता उपेन पटेल आणि अभिनेत्री करिष्मा तन्नाचं ब्रेकअप झालं आहे.
बिग बॉसच्या आठव्या पर्वामध्ये एका घरात राहताना करिष्मा आणि उपेन यांचं सूत जुळलं. अनेकदा बिग बॉसचा सिझन संपला की त्यातील जोडप्यांची तोंडं दोन दिशांना फिरलेली दिसतात. मात्र करिष्मा आणि उपेन यांचं प्रेमप्रकरण त्यानंतरही काही काळ सुरु होतं.
उपेन पटेलने ट्विटरवरुन आपल्या ब्रेकअपची जाहीर कबुली दिली आहे. 'मी आणि करिष्मा परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या प्रेमाबद्दल आभार' असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
'अनेक गोष्टी उजेडात आल्या आहेत, त्यांचे खरे रंग दिसून आले आहेत. प्रेम कधीच सोपं नसतं. एकदा काही गोष्टी तुटल्या की त्यांच्यासह पुढे जाणं कठीण असतं' असंही उपेनने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/upenpatelworld/status/728827507051364352
गेल्या वर्षी नच बलिए या डान्स रिअॅलिटी शोमध्येही दोघं सहभागी झाले होते. त्यावेळी ऑन स्क्रीन त्याने करिष्माला रिंग देऊन प्रपोज केलं होतं. त्याशिवाय एमटीव्हीवर लव्ह स्कूल या रिअॅलिटी शोसाठी ते स्पर्धकांचे लव्ह गुरु झाले होते. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात दोघांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत.
https://twitter.com/upenpatelworld/status/729001415725572096