Uorfi Javed:   उर्फी जावेद  (Uorfi Javed)

  ही तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. उर्फीला ही विविध आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. काही लोक उर्फीचं कौतुक करतात तर काही जण तिला ट्रोल करतात.  नुकतीच उर्फीला एका व्यक्तीनं धमकी दिली आहे. या व्यक्तीच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


'लवकरच तुझ्यावर गोळ्या झाडल्या जातील. लवकरच मिशन पूर्ण होईल, तू भारतात पसरवलेली घाण साफ केली जाईल.' असं म्हणत एका व्यक्तीनं उर्फीला धमकी दिली आहे. या व्यक्तीच्या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन उर्फीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, माझ्या आयुष्यातील रेग्युलर दिवस' उर्फीनं शेअर केलेल्या या स्क्रिनशॉर्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.






कोण आहे उर्फी जावेद?


अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरात या क्षेत्रांमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. 2015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमधून उर्फी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर फोटोमुळे उर्फी ही चर्चेत असते.


प्लास्टिक, वायर,पिझ्झा आणि काचा यांसारख्या गोष्टींचा वापर करुन तयार करण्यात आलेले आऊटफिट उर्फी परिधान करते. त्या आऊटफिटमधील फोटो उर्फी सोशल मीडियावर शेअर करते. उर्फीच्या या फॅशन सेन्समुळे अनेकवेळा नेटकरी उर्फीला ट्रोल करतात. काही दिवसांपूर्वी उर्फीचा एअरपोर्टवरील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.  ज्यामध्ये दिसले की,एक माणूस उर्फीकडे पाहतो आणि म्हणतो,  'देशाचं नाव खराब करत आहेस'






उर्फी ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते. उर्फीच्या फोटोवर काही नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Uorfi Javed: 'देशाचं नाव खराब करत आहेस'; उर्फीचा ड्रेस पाहून भडकला व्यक्ती; अभिनेत्रीसोबत एअरपोर्टवर झाली बाचाबाची, व्हिडीओ व्हायरल