ओमी कलानींची हातात तलवार घेऊन स्टेजवर एन्ट्री
एबीपी माझा वेब टीम | 30 Jan 2017 03:05 PM (IST)
उल्हासनगर : नुकतीच भाजपशी युती केलेले पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनी भर सभेत तलवार दाखवून स्टेजवर एन्ट्री केली. उल्हासनगरमध्ये आयोजित केलेल्या सभेत हा प्रकार घडला. विशेष म्हणजे या सभेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त होता आणि त्यांच्या डोळ्यात हा प्रकार घडला. या सभेत ओमी कलानींनी कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून, हातात भली मोठी तलवार घेऊन सभेच्या ठिकाणी आगमन केलं. निवडणूक काळात परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्यांना आपल्याकडील शस्त्र पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, तरीही पोलिसांसमोर उल्हासनगरमध्ये कायद्याची पायमल्ली करण्यात आली.