नवी दिल्लीः उडता पंजाब सिनेमाच्या वादावरुन हायकोर्टात सुरु असलेल्या वादावर हायकोर्ट आज निकाल देणार आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने सेन्सॉर बोर्डाला चांगलच सुनावलं होतं. मात्र कोर्टाच्या निर्णयापूर्वीच 'अ' श्रेणी प्रमाणपत्र दिलं आहे.


 

चित्रपट चांगला किंवा वाईट हे ठरवण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहे, सेन्सॉर बोर्डाने फक्त प्रमाणपत्र देण्याचं काम करावं, अशा शब्दात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कार्टाने सेन्सॉर बोर्डाला सुनावलं होतं.

 

कोर्टाच्या सुनावणीपूर्वीच उडता पंजाबला 'अ' श्रेणी प्रमाणपत्र दिल्यामुळे कोर्ट काय निर्णय देईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सिनेमाचे निर्माते अनुराग कश्यप यांनी सेन्सॉर बोर्डाविरोधात कोर्टात धाव घेतली होती.

 

संबंधित बातम्याः 

 

'उडता पंजाब'ला सेन्सॉरकडून 'ए' सर्टिफिकेट, आज हायकोर्टात सुनावणी


 

तुम्ही फक्त प्रमाणपत्रं द्या, निवडीचा अधिकार प्रेक्षकांना : हायकोर्ट