मुंबई : मिसेस फनी बोन्स अशा टोपणनावाने नर्मविनोदी शैलीत लेखन करणारी अभिनेत्री म्हणून ट्विंकल खन्ना प्रसिद्ध आहे. ट्विंकलच्या ट्वीट्सवरुन बऱ्याचदा तिच्या चाहत्यांच्या चर्चा झडतात. मात्र यावेळी तिला काही ट्विटराईट्सच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. समुद्र किनारी शौचाला बसलेल्या पुरुषाचा फोटो पोस्ट केल्याने ट्विंकलवर टीकास्त्र सोडलं जात आहे.


मुंबईतील एका बीचवर मॉर्निंग वॉकला गेलेल्या ट्विंकलला वाळूत 'टॉयलेट' करणारा पुरुष आढळला. तात्काळ तिने दूरुन एक सेल्फी घेत ट्विटरवर पोस्ट केला. नुकताच तिचा पती, अभिनेता अक्षय कुमारचा 'टॉयलेट : एक प्रेमकथा' हा चित्रपट रीलिज झाला आहे. त्याचाच आधार घेत तिने फोटोला कॅप्शनही दिलं. 'गुड मॉर्निंग. मला वाटतं, हा टॉयलेट : एक प्रेमकथा भाग 2 चा पहिला सीन असावा' असं तिने ट्वीट केलं.

https://twitter.com/mrsfunnybones/status/898778647644983297
ट्विंकलचा हा फोटो संबंधित पुरुषाच्या सन्मानाचा भंग असल्याची टीका होऊ लागली. तिने हा फोटो काढावा आणि माफी मागावी, असी मागणी काही ट्विटराईट्सनी केली. 'केवळ हा पुरुष आहे म्हणून तू त्याचा फोटो शेअर करतेस. जर आम्ही एखाद्या महिलेचा असा फोटो टाकला असता तर...' असा सवालही काही जणांनी उपस्थित केला.

https://twitter.com/devdattab1/status/898958709509898240

https://twitter.com/YoursJatin/status/899128005418733569

अनेक ट्विटराईट्सनी ट्विंकलचं समर्थनही केलं. 'समुद्र किनारी उघड्यावर टॉयलेट करणाऱ्या पुरुषाला कसला आलाय सन्मान? या व्यक्तीनेच सर्वांची माफी मागायला हवी.' असं एकीने म्हटलं. गरीबी हे उघड्यावर शौचा करण्याचं कारण असूच शकत नाही. प्रत्येकाला जवळच्या सार्वजनिक शौचालयात जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असं काही जणांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/aarkay2015/status/899129659761106944

https://twitter.com/naamvar/status/899107933182504960