मुंबई : आपल्या समाजातील तरुणी, मग त्या कोणत्याही आर्थिक, सामाजिक गटातील असो, कुठल्याही वयाच्या असो किंवा प्रसिद्धीचं वलय असो, बहुतेकींना छेडछाडीचा अनुभव आलेला असतो. बॉलिवूड अभिनेत्री एलियाना डिक्रुझला नुकतंच मुंबईत टवाळांचा वाईट अनुभव आला. त्यावर तिने सोशल मीडियावर आपली सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.

'आपण राहत असलेलं जग फारच वाईट झालं आहे. मी एक पब्लिक फिगर आहे. मला खाजगी किंवा गुप्त आयुष्य राहिलेलं नाही, याची पूर्ण जाणीव आहे. पण याचा अर्थ कोणीही माझ्याशी गैरवर्तन करावं, असा होत नाही. 'चाहत्यां'नी याचं भान राखावं. शेवटी मी एक स्त्री आहे.' अशा शब्दात एलियानाने आपला संताप व्यक्त केला आहे.

एलियानाने ट्वीटमध्ये घटनेचा उल्लेख केलेला नाही, मात्र 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत तिला आलेला वाईट अनुभव सांगितला आहे. मुंबईतील एका फॅशन शोला जाण्यासाठी ती कारने निघाली होती. ट्राफिकमध्ये तिची गाडी बराच वेळ अडकली होती.

त्याचवेळी काही जणांनी तिच्या कारची काच आपटायला सुरुवात केली. काही जण स्वतःला कारवर ढकलत होते. एक जण तर कारच्या बोनेटवर बसून हसत होता. सिग्नल सुटल्यावर काहीजण पाठलाग करत राहिले. 'मी तरुण असताना माझ्याशी छेडछाड झाली होती. मात्र आताही असं होईल. हे मला वाटलं नव्हतं.' अशी खंत एलियानाने व्यक्त केली.

https://twitter.com/Ileana_Official/status/899206980853792769

https://twitter.com/Ileana_Official/status/899207063875629056