मुंबई : निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात. गुरमात राम रहिम सिंग इन्सान यांनी मात्र संत तुकारामांची उक्ती फारच मनावर घेतली आहे. ट्विटरवरुन उणीदुणी काढणाऱ्या ट्विंकल खन्नाच्या शेजारीच राम रहिम यांनी डेरा हलवला आहे.


जुहू चौपाटीसमोरील एका इमारतीत ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार राहतात. याच इमारतीतील एकेक मजला हृतिक रोशन आणि निर्माते साजिद नाडियादवाला यांच्या नावावर आहे. याच परिसरात आता गुरमीत राम रहिम सिंग यांनीही आपला मुक्काम हलवला आहे.

एमएसजी चित्रपटातून झळकलेले गुरमीत राम रहिम आता ट्विंकलच्या शेजारी रहायला गेले आहेत. ट्विंकलने तिच्या ट्विटर अकाऊण्टवरुन त्यांचा पोशाख, किंवा स्टाईलविषयी टिपणी केली आहे. राम रहिम नव्या जागेत शिफ्ट होताच ट्विंकल पुन्हा त्यांचा फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केला आहे.