Reem Shaikh Accident : अभिनेत्री रीम शेखसोबत मालिकेच्या सेटवर मोठा अपघात घडल्याची माहिती आहे. अभिनेत्री रीम शेख सध्या कुकिंग-कॉमेडी शो 'लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट' मध्ये दिसत आहे. याच मालिकेच्या सेटवर रीमसोबत दुर्घटना घडली. रीमने या घटनेबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. आता या दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. जेवण बनवताना रीम शेखचा चेहरा भाजतो, असं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. चेहऱ्या भाजल्यानंतर रीम वेदनेने ओरडताना दिसत आहे.


मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीसोबत घडला मोठा अपघात


कुकिंग-कॉमेडी शो लाफ्टर शेफ्सच्या (Laughter Chefs) सेटवर रीम शेखसोबत (Reem Shaikh) अपघात घडल्याचा ज्याचा व्हिडीओ आता कलर्सच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलं आहे. कलर्सने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रीम शेख जेवण बनवताना दिसत आहे. तिच्या शेजारी लाफ्टरक्वीन भारती सिंह उभी आहे. यानंतर जेवण बनवताना अचानक तिच्या चेहऱ्यावर गरम-गरम पदार्थ उडतो आणि तिचा चेहरा भाजतो, यानंतर सेटवरील सर्व जण धावत रीमकडे जातात. 


रीम ओरडताच धावले इतर स्पर्धक 


स्वयंपाक करताना रीम शेखचा चेहरा भाजला आणि ती वेदनेने ओरडू लागली. लाफ्टर शेफच्या सेटवर स्वयंपाक करणाऱ्या रीमसोबत अपघात झाला. व्हिडिओमध्ये रीम स्वयंपाक करताना दिसत आहे. यादरम्यान भारती सिंह त्याच्या शेजारी उभी आहे आणि रीमही त्याच्याशी बोलत आहे. दरम्यान, रीम अचानक किंचाळते आणि तिच्या चेहऱ्यावर हात ठेवते. रीमची ओरड ऐकून शोचे इतर सर्व स्पर्धक अंकिता लोखंडे, अली गोनी, राहुल वैद्य, कश्मिरा शाह, करण कुंद्रा, अर्जुन बिजलानी आणि निया शर्मा धावत तिच्याकडे येतात.


घटनेचा व्हिडीओ समोर






वाढदिवसाच्या एक दिवस आधी सांगितली अपघाताची बातमी


रीम शेखने तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी 7 सप्टेंबर रोजी तिचे दोन फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर भाजल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. यासोबतच रीमने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, 3.9.24 रोजी माझ्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे माझं आयुष्य बदलू शकलं असतं, पण अल्लाहने मला त्या दुर्घटनेतून वाचवलं. मला वाचवल्याबद्दल मी अल्लाहचे आभार मानते. 






यानंतर काही दिवसांनी रीमने तिच्या तब्येतीबाबत अपडेट देत सांगितलं होतं की, 'आता मी बरी झाली आहे'. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, 'ज्या स्त्रीला देवाकडून शक्ती मिळते त्या स्त्रीला कुणीही तोडू शकत नाही'.






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला मनसेचा विरोध, 'लिजेंड ऑफ मौला जट' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा