Sheezan Khan Family Press Conference : तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी शिझान खानला (Sheezan Khan) ताब्यात घेतलं आहे. आता शिझानच्या कुटुंबियांनी तुनिषा शर्माच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत. 


शिझानची बहिण फलक नाज म्हणाली,"तुनिषा आणि माझं नातं खूपच चांगलं होतं. लडाखमध्ये एका शूटदरम्यान मला ती भेटली होती. तुनिषाच्या आईने तुनिषाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. ती तिची काळजी घेत नव्हती. लहानपणी तुनिषाचा अपघात झाला होता. तेव्हापासून ती डिप्रेशनमध्ये गेली होती". 


















बहिण पुढे म्हणाली,"हिजाब घातलेला तुनिषाचा फोटो हा शूटिंगदरम्यानचा आहे. आम्ही तिला कधीही हिजाब घालायला लावला नाही. तिचा हिजाब घातलेला फोटो हा सेटवरील आहे. तसेच शिझान कधीच ड्रग्जचं सेवन करत नव्हता. तुनिषाच्या आईने शिझानवर केलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. शिझानला तुनिषा शर्माशिवाय कोणतीही मैत्रीण नव्हती. त्याचे अनेक मुलींसोबत संबंध होते हा आरोप चुकीचा आहे". 


तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आज शिझानच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी वसई न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 


संबंधित बातम्या


Tunisha Sharma Case : अल्बम साँगसाठी तुनिषाची जबरदस्तीने सही घेतली; शिझानच्या कुटुंबियांचा प्रोडक्शन हाऊसवर मोठा आरोप