ओम पुरींचा अखेरचा आवाज, 'ट्युबलाईट'चा ट्रेलर लाँच
एबीपी माझा वेब टीम | 25 May 2017 09:14 PM (IST)
मुंबई : अभिनेता सलमान खानचा मच अवेटेड सिनेमा ट्युबलाईटचा पहिला ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. ट्रेलर लाँचिंगसाठी सलमान खान, अभिनेता सोहेल खान आणि सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांची उपस्थिती होती. ट्रेलर लाँच करण्यापूर्वी सलमानने दिवंगत अभिनेते ओम पुरी, रिमा लागू आणि विनोद खन्ना यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सलमान भावूक झालेला पाहायला मिळाला. https://twitter.com/BeingSalmanKhan/status/867621257595854848 ओम पुरी अचानक सोडून गेले. सिनेमाचे गाणी किंवा टीझर पाहतो तेव्हा त्यांची प्रचंड आठवण येते. त्यामुळे टीझर आणि गाण्याचा आनंद घेता येत नाही, असं सलमान म्हणाला. सलमानने या तिन्हीही दिवंगत कलाकारांसोबत काम केलेलं आहे. ट्युबलाईट हा ओम पुरी यांचा अखेरचा सिनेमा आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचं हृदविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. पाहा सिनेमाचा ट्रेलर :