TJMM Box Office Collection Day 16: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा  'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Mein Makkar) हा चित्रपट  रिलीज होऊन 16 दिवस झाले आहेत. 16 दिवसात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. चित्रपटातील रणबीर आणि श्रद्धा यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. जाणून घेऊयात 'तू झूठी मैं मक्कार'  चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...


रोमँटिक-कॉमेडी कथानकावर आधारित असणारा 'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काहीच दिवसात 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला.  गुरुवारी म्हणजेच 23 मार्च रोजी  'तू झूठी मैं मक्कार'  या चित्रपटानं 2 कोटींची कमाई केली. या चित्रपटानं आतापर्यंत 119.29 कोटींची कमाई केली आहे. 


150 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार 'तू झूठी मैं मक्कार'? 


'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यामध्ये 120 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज लावला जात आहे. पण हा चित्रपट 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. 31 मार्चला अजय देवगणचा भोला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाची 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होईल. अभिनेत्री तब्बूनं देखील या चित्रपटात काम केलं आहे. अजयच्या भोलासमोर रणबीरचा 'तू झूठी मैं मक्कार' टिकू शकेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


लवकरच 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे. 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा यांच्यासोबतच अनुभव सिंह बस्सी, डिंपल कपाडिया यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून बोनी कपूर यांनी अभिनयात पदार्पण केलं. 


रणबीर आणि श्रद्धा हे 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटानंतर काही बिग बजेट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. रणबीरचा अॅनिमल हा आगामी चित्रपट लवकरच रिलीज होईल. चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच श्रद्धा ही स्त्री-2 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


 इतर महत्वाच्या बातम्या:


TJMM OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर रणबीर-श्रद्धाचा 'तू झूठी मैं मक्कार' ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या कुठे पाहू शकता?