Trending Song : मनोरंजनसृष्टीसह संगीत क्षेत्रात नाव कमवायचे असेल तर  अनेक वर्षांच्या मेहनतीबरोबरच ताल, सूर आणि लय यातही परिपूर्ण असावं लागतं. तर दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी नाव कमावलं आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे ढिंच्याक पूजा. 


ढिंच्याक पूजाने 'सेल्फी मैंने ले ली आज' हे गाणे यूट्युबवर रिलीज केल्यानंतर रातोरात ती प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या गाण्यांत ताल, सूर आणि लय यांचा अभाव असला तरी तरीही ती सतत नवनवीन गाणी चाहत्यांच्या भेटीला घेऊन येत असते. सध्या तिचे 'आय अॅम अ बायकर' हे गाणे रिलीज झाले असून सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले आहे.


व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील ढिंच्याक पूजाचा लूक हटके आहे. तिच्या या गाण्याचे बोल आहेत,"आय अॅम अ बायकर, जैसे कोई टायगर, मोटे थोडी डाएट कर, तू भी मुझे लाइक कर". पूजाने या गाण्याचा व्हिडीओ शेअर करताच दोन दिवसांतच या गाण्याला 82 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच तिचे हे गाणे सोशल मीडियावर नेटकरी ट्रोल करताना दिसत आहेत. 


गाणं म्हणजे सुरेल, सुमधूर आवाजाचा संगम असा जो काही आपला पूर्वापार चालत आलेला समज आहे, तो आपल्या आवजाने खोडून काढणारी ढिंच्याक पूजा पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीला आली आहे नवीन गाणं घेऊन.  एका मुलाखतीमध्ये तिने आपण व्हिडीओवरील नकारात्मक कमेंट वाचत नसल्याचे सांगितले होते. 


संबंधित बातम्या


Pandu : आला रे आला पांडू छोट्या पडद्यावर आला, 30 जानेवारीला होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर


15 वर्षांपासून नशीब आजमावणाऱ्या रसिका दुग्गलला OTT वर लॉटरी; जाणून घ्या मिर्झापूरच्या बिना त्रिपाठीबद्दल


Pushpa : 'पुष्पा'च्या यशात अमूलही सहभागी, शेअर केले अल्लू अर्जुनचे व्यंगचित्र


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha