Kantara Chapter 1 War Scene : कांतारा या चित्रपटाला येऊन दोन वर्षे झाली. मात्र या चित्रपटाची अजूनही तेवढीच चर्चा होते. 2022 साली या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मोडले होते. दरम्यान, याच चित्रपटाचा आता प्रक्वेल येत आहे. या चित्रपटाचे नाव 'कांतारा: चॅप्टर 1' असे ठेवण्यात आले असून त्याच शूटिंग चालू आहे. दरम्यान, याच चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट प्रभावी व्हावा यासाठी चित्रपटाचे निर्माते तसेच दिग्दर्शक पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाचे शूटिंग चालू आहे. कांतारा: चॅप्टर 1 या चित्रपटात युद्धाचे एक भव्य दृश्य दिसणार आहे. या युद्धाला पाहून प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहावेत यासाठी शूटिंगासाठी भव्य सेट उभारला जात आहे. युद्धाचे चित्र खरेखुरे भासावे यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांना बोलावले जात आहे. हा वॉर सिन एकूण तीन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
500 से ज्यादा प्रोफेशनल फाइटर्स को किया गया हायर
कांतारा: चॅप्टर 1 चित्रपटातील वॉर सिन शूट करण्यासाठी तब्बल 500 सराईत फायटर्सना बोलावण्यात आले आहे. या सर्व फायटर्सना सोबत घेऊ भव्य-दिव्य असे समारंगण उभे केले जाणार आहे. अॅक्शन कोरिओग्राफर्सची मदत घेऊन हा सिन सर्वोत्तम कसा होईल, यासाठी प्रयत्न चालू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या युद्धाचा सिन अविस्मरणीय, अद्भूत असा असणार आहे.
कांतारा: चॅप्टर 1 चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
कांतारा: चॅप्टर 1 हा चित्रपट प्रभावी ठरवा यासाठी चित्रपटातील प्रमुख अभिनेता ऋषभ शेट्टी याने कालारीपयट्टू या जगातील सर्वांत जुन्या मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. या वर्षाच्या 2 ऑक्टोबर रोजी कांतारा: चॅप्टर 1 हा चित्रपट सिनेमागृहांत येणार आहे. होम्बले या निर्मिती कंपनीकडे कांतारा: चॅप्टर 1 या चित्रपटाव्यतिरिक्त सालार : पार्ट 2- शौर्यांगा पर्वम हा चित्रपटही आहे. लवकरच हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
धक्कादायक! वीर पहारियावर विनोद केला म्हणून कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण