Laxmi Niwas Marathi Serial : मराठी मालिकांचा महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग आहे. या मालिका पाहण्यासाठी घरातील महिला वेळ राखून ठेवतात. सध्या झी मराठीवरील लक्ष्मीनिवास या मालिकेची सगळीकडे चर्चा आहे. या मालिकेत जयंत आणि जान्हवी यांची कहाणी आहे. दरम्यान, या मालिकेत आता मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट आला आहे. जयंतचं घरं रुप पाहून जान्हवी आश्चर्यचकित झाली असून आता या मालिकेत पुढं नेमकं काय होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
लक्ष्मीनिवास मालिकेत नेमकं काय घडणार?
लक्ष्मीनिवास या मालिकेत जयंत आणि जान्हवी या दोघांचे लग्न झाले आहे. विशेष म्हणजे जयंतही जान्हवीवर जीवापाड प्रेम करतोय. जयंतशी लग्न झाल्यामुळे जान्हवीही फारच आनंदी आहे. मात्र आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. लग्नानंतर जान्हवीचा जयंतच्या घरी गृहप्रवेश झाला आहे. जयंतने तिच्यासाठी घर चांगलं सजवलं आहे. पण अचानक एका प्रसंगामुळे जान्हवीला धक्का बसला आहे.
झुरळ पाहून जान्हवी घाबरते
झी मराठीने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नेमकं काय घडणार? याची एक झलक दाखवली आहे. जान्हवी घरात आल्यानंतर तिच्या साडीवर अचानकपणे एक झुरळ येते. झुरळ पाहून जान्हवी चांगलीच घाबरते. ती भीतीने ओरडते. यामुळे जयंत तिला नेमकं काय झालं? असं विचारतो. हा प्रकार समजल्यानंतर जयंतचं खरं रुप समोर येतं. हे रुप पाहून जान्हवीला धक्काच बसतो.
जान्हवी घाबरल्यामुळे जयंत करतो भयंकर कृत्य
सध्या समोर आलेल्या प्रोमोनुसार जान्हवी घाबरल्यामुळे जयंत रागात येऊन त्या झुरळाला पकडताना दिसतोय. विशेष म्हणजे त्याने ते झुरळ हातातच चिरडून ते दुधात टाकून खाल्ल्याचे दिसत आहे. जान्हवीला त्रास दिल्याचा बदला म्हणून जयंतने हे कृत्य केले आहे. हा सर्व प्रकार पाहताच जान्हवी चांगलीच घाबरलेली दिसत आहे.
मालिकेत आता नेमकं काय होणार?
त्यामुळेच जयंतचे खरे रुप बाहेर आल्यामुळे आता लक्ष्मीनिवास या मालिकेत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जयंत मनोरुग्ण आहे का? तो फार क्रूर आहे का? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा :