Abhijat Natya Mahotsav : 15 ऑगस्टला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होणार आहे. त्यानिमित्त संपूर्ण भारतभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवानिमित्तम मुंबईत 12 तास आणि पुण्यात 24 तास 'अभिजात नाट्य महोत्सव' (Abhijat Natya Mahotsav) रंगणार आहे. तसेच 'अभिजात'चा निर्माता आकाश भडसावळे स्वातंत्र्यदिनाला मानवंदना म्हणून पुण्यात सलग सहा प्रयोगांचा महाविक्रम करणार आहे. 


'अभिजात नाट्य महोत्सव' कुठे रंगणार?


अभिजात नाट्य महोत्सव 9 ऑगस्टला मुलुंडच्या महाकवी कालिदास नाट्यमंदिरात सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत रंगणार आहे. तर 13 ऑगस्टला रात्री 11.50 ते 15 ऑगस्ट पहाटे 00.10 पर्यंत पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात रंगणार आहे. तसेच या महोत्सवात 'टिळक आणि आगरकर', 'वासूची सासू' आणि 'होय मी सावरकर बोलतोय' या तीन नाटकांचे प्रयोगदेखील रंगणार आहेत. 


'अभिजात नाट्य महोत्सवा'त सादर होणाऱ्या नाटकाविषयी जाणून घ्या...


टिळक आणि आगरकर


लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर भाष्य करणारं 'टिळक आणि आगरकर' हे नाटक आहे. या नाटकात नयना आपटे, सुनिल जोशी, आकाश भडसावळे, संध्या म्हात्रे, गायत्री दीक्षित, प्राची सहस्त्रबुद्धे मुख्य भूमिकेत आहेत. 


वासूची सासू


'वासूची सासू' हे विनोदी नाटक आहे. दुर्गेश मोहनने या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अभिजीत केळकर, अंकुर वाढवे, आशा ज्ञाते, आकाश भडसावळे, संजना पाटील, अथर्व गोखले या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


होय मी सावरकर बोलतोय!


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राजकीय जीवनावर आधारित 'होय मी सावरकर बोलतोय' हे नाटक आहे. या नाटकात आकाश भडसावळे, बहार भिडे, दुर्गेश आकेरकर, कविता विभावरी, शैलेश चव्हाण, दीपक जोईल, माधव जोशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


जागतिक रंगभूमी दिन : आपलं नाटक एकटं पडलंय?


The Clap : मराठी भाषेतलं पहिलं कृष्णधवल प्रायोगिक नाटक... 'द क्लॅप'