HSC RESULT : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा (Maharashtra HSC Results 2022 Declared) निकाल नुकताच जाहीर झाला आहे. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. तर काही विद्यार्थी मात्र नाराज झालेले दिसून येत आहे. कमी गुण मिळाल्यामुळे किंवा हवे तसे टक्के न मिळाल्याने हे विद्यार्थी नाराज झाले आहेत. पण विद्यार्थ्यांचे आवडते बॉलिवूड सेलिब्रिटी मात्र 12 वीच्या परीक्षेत नापास झाले होते. पण हे सेलिब्रिटी सध्या त्यांच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. 


12 वी बोर्डाच्या यंदा कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. पण विद्यार्थ्यांचे लेक्चर मात्र ऑनलाईन पद्धतीने झाले होते. त्यामुळे निकालाची विद्यार्थ्यांच्या मनात भीती होती. पण बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेले अनेक कलाकार सध्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. 


कंगना रनौत (Kangana Ranaut) : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत बारावीच्या परीक्षेत केमिस्ट्रीमध्ये नापास झाली होती. कंगनाला अभ्यास आवडत नसे. 


कतरिना कैफ (Katrina Kaif) : कतरिनाने वयाच्या 14 व्या वर्षीच पैसे कमवायला सुरुवात केली होती. तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिला शिक्षण सोडावे लागले होते. 


अर्जुन कपूर (Arjun Kapoor) : अर्जुन कपूरदेखील बारावीच्या परीक्षेत एका विषयात नापास झाला होता. त्यालाही अभ्यासात रस नव्हता. 


करिष्मा कपूर (Karisma Kapoor) : करिष्मा कपूरने बॉलिवूडमध्ये खूप लवकर पदार्पण केलं होतं. त्यामुळे तिलाही शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. 


काजोल (Kajol) : काजोलने वयाच्या 16 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिला अभ्यासाची आवड नसल्याने तिनेदेखील शिक्षण पूर्ण केलेलं नाही. 


मराठी सेलिब्रिटीदेखील बोर्डाच्या परीक्षेत झाले होते नापास


नागराज मंजुळे : मराठमोळे दिग्दर्शक, लेखक, कवी नागराज मंजुळे दहावीत दोनवेळा नापास झाले होते. 


छाया कदम : सैराट, फँड्री, न्यूड, अंधाधूंद, झुंड, गंगुबाई काठियावाड, रेडू यासह अनेक सिनेमात अभिनय केलेली अभिनेत्री म्हणजे छाया कदम. छाया कदमदेखील बारावीच्या परीक्षेत नापास झाली होती. 


संबंधित बातम्या


Result : निकाल काहीही येवो, निराश होऊ नका; 'हे' दिग्गजही परीक्षेत नापास पण जीवनात मात्र टॉपर


Maharashtra HSC Result 2022 : 12 वी नंतर काय कराल? जाणून घ्या शिक्षणाच्या संधी